चोपडा (संदिप ओली) – राज्यातील सत्ताधारी आघाडी सरकारने जनतेला वार्यावर सोडले आहे.. दुध उत्पादकांसह राज्यातील सर्वच शेतकर्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे..म्हणून अशा संकट काळात शेतकरी बांधवांना न्याय देण्यासाठी ,झोपलेल्या आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पाटीॅ व मित्र पक्षाच्या महायुतीतर्फे राज्यव्यापी आंदोलन होणार आहे..
दुध उत्पादकांना सरसकट १० रूपये प्रति लिटर व दुध पावडरला प्रति किलो ५० रूपये अनुदान मिळायलाच पाहिजे, या मागणीचे भारतीय जनता पार्टी,रिपाई आठवले गट,रासप,रयत क्रांती व शिवसंग्राम महायुतीच्या वतीने चोपडा येथे तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन सादर करण्यात आले होते.
आंदोलनातील प्रमुख मागण्या गाईच्या दुधाला सरसकट १० रूपये प्रति लिटर व दुध पावडरला प्रति किलो ५० रूपये अनुदान मिळणेबाबत, दुध खरेदीचा दर प्रति लिटर ३०/रुपये करण्यात यावा.. शेतकर्यांच्या मागील वर्षाचा घरात पडून असलेला कापूस,मका,आणि ज्वारी लवकरात लवकर हमी भावाने पूर्णपणे खरेदी करुन दिलासा द्यावा, शेतकर्यांना युरिया सह,तत्समरा.खतांचा मुबलक पूरवठा करण्यात यावा,काळाबाजारी करणार्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी.. कोरोना संकटकाळ,ताळेबंदी मधील तीन महिण्याचे अवाजवी आलेले विजबिल सरसकट माफ करावे इत्यादी मागण्याचे निवेदन चोपडा भाजपा महायुतीकडून राज्य शासनाकडे मागणी करण्यात आली होती तसेच..ही मागणी मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता,कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात म्हणून शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पाटीकडून राज्य शासनाला निवेदन सादर करण्यात आले होते..परंतु गेंड्याच्या कातडी असलेल्या व झोपेचे सोंग घेतलेल्या राज्यातील सत्ताधारी आघाडी शासनाला शेतकरी बांधवांच्या,नागरिकांच्या वरील समस्या सोडवण्याची इच्छा दिसत नाही, म्हणून सरकारला वरील प्रश्नांवर जागे करण्यासाठी हे एल्गार आंदोलन आयोजित केले गेले आहे..
दि १ ऑगस्ट २०२० शनिवार रोजी ठिक- १० वाजता ठिकाण- पंकज नगर स्टॉप रस्ता चोपडा येथे भाजपा महायुती मित्रपक्षांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन होणार आहे. या आंदोलनाचे स्वरूप- सर्व दुधसंकलन (ग्रामीण व शहरी भागातील)केंद्रे बंद पाडणे..रास्ता रोको करणे, दुध टँकर अडवून ठेवणे..तहसीलदार यांना निवेदन देणे,दुध पिशव्या भेट देणे.
या आंदोलनाला तिलकजी शहा (जेष्ठ नेते चोपडा भाजपा), शांतारामआबा पाटील (मुलुख मैदान तोफ/मा.जि.प.सदस्य), आत्मारामभाऊ म्हाळके (मा.सभापती पं.स.चोपडा), चंद्रशेखरदादा पाटील (जेष्ठनेते भाजपा), प्रदिपभाऊ पाटील (चोपडा विधानसभा संयोजक), राजुभाऊ शर्मा (मा.शहराध्यक्ष चोपडा), सौ.ज्योतीताई राकेश पाटील सभापती महिला व बालकल्याण जि.प.जळगाव), सौ.उज्ज्वलाताई प्रशांत म्हाळके ( कृषी व पशुसंवर्धन सभापती जि.प.), गजेंद्रभाऊ पांडुरंग सोनवणे (जिल्हा परिषद सदस्य), भुषणभाऊ भिल (उपसभापती चोपडा पं.समिती), पंकज सुभाष पाटील (तालुकाध्यक्ष चोपडा ग्रामिण), संचालक कृ.उ.बा.समिती चोपडा धनंजय प्रभाकर पाटील, भरत बापूराव पाटील, मगन मुरलिधर बाविस्कर, हिंमतराव पाटील ( मा.व्हॉ.चेअरमन शेतकी संघ), सौ.रंजनाताई श्रीकांत नेवे (संचालिका-तापी सह.सुतगिरणी), .नरेंद्रभाऊ पाटील (जिल्हा उपाध्यक्ष यु.मोर्चा) यांची विशेष उपस्थिती होती.
या आंदोलनात आजी-माजी पदाधिकारी, मा.सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती/उपसभापती, सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था पदाधिकारी, महायुतीचे सर्व पदाधिकारी, गटप्रमुख, गणप्रमुख,शाखाध्यक्ष, नगरसेवक,आघाडी/मोर्चा पदाधिकारी,शक्तीकेंद्रप्रमुख, बुथप्रमूख ,कार्यकर्ते बंधू,दुध उत्पादक शेतकरी बांधव,दुध सोसायट्यांचे पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीच्या वतीने पंकज सुभाष पाटील, (तालुकाध्यक्ष भाजपा ग्रामिण) आणि श्री.गजेंद्र जैस्वाल, (चोपडा शहराध्यक्ष), सरचिटणीस- हनुमंतराव महाजन, चंद्रकांत धनगर, डॉ. मनोहर बडगुजर, सुनिल सोनगिरे, प्रकाश लक्ष्मण पाटील (यु.मो.तालुकाध्यक्ष), तुषार पाठक (यु.मो.शहराध्यक्ष), भरत सोनगिरे (जिल्हा संयोजक), मोहित भावे (कार्यालय मंत्री भाजपा) भाजपा ,रिपाई आठवले गट,रयत क्रांती संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष , रिपाई , रयत क्रांती संघटना,शिवसंग्राम पक्ष महायुतीच्या पदाधिकार्यांनी केले आहे..







