धडाडीचे नेत्तृत्व; किर्तिवंत पंकज नाले

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – यश संपादन करण्यासाठी खुप मेहनत व काबाडकष्ट करावे लागतात हे आज पर्यंत फक्त पुस्तकात वाचले होते पण जेव्हा आपली भेट प्रतक्ष्यात अश्या जिवंत उदाहरण ठरणाऱ्या तरुणांशी होते तेव्हा खुप प्रेरणा मिळते. आजच्या या धकाधकी च्या जीवनात दुसऱ्यांसाठी झटताना स्वतः आपण जेव्हा इतरांसाठी प्रेरणा देणारा व्यक्ती प्रत्यक्ष आपल्याच आयुष्यात पाहतो तेव्हा खरचं कुठे तरी असे वाटते की समाज घडवणारे असेच प्रेरणादायी व सामजिक यष्टिरक्षक ठरणारे तरुण जर शिक्षणाने घडतील आणि इतरांना घडवतील तर नक्किच भारत देश पुन्हा समृद्ध होइल यात तिळमात्र शंका नाही.
असाच एक धडाडीचा तरुण , मजबूत फौलादी इरादे , महत्त्वाकांक्षी, सर्वां साठी झटणारा युवक म्हणजेच जनमत प्रतिष्ठान जळ्गावचे अध्यक्ष पंकज नाले. जो वयाच्या १५ व्या वर्षापासून म्हणजेच १९९९ सालापासून १२ वी शिक्षण झाल्यावर छोट्या छोट्या कामाची लाज न बाळगता मेहनतीची तयारी ठेवून पेट्रोल पंप, जागोजागी भूकतहान विसरुन उन्हा तान्हात कपडे विकणे, मिळेल ते काम करुन या विविध कामांपासून प्रगती संपादनासाठी दूरदृष्टीने लक्ष्य केंद्रीत करुन मेहनतीने एक एक पायरी वर चढत गेला व ३ जानेवारी २०१८ साली समाज व लोकांच्या हितासाठी जनमत प्रतिष्ठानची स्थापना करुन यशाचा मानकरी ठरला. पंकज यांनी मनाशी निश्चय केला होता की जो त्रास त्यांना शिक्षण घेताना झाला व शिक्षण अभावी प्रगतीला अडथळा ठरला तो इतर युवा पिढीला होवू नये यासाठी त्यांनी २०१० साली मार्केटिंगची सुरुवात केली. यात त्यांनी गरजू, विधवा माता भगिनी व युवतींसाठी गावोगावी, खेडोपाडी जाउन शिवणकाम, ब्यूटी पार्लर कोर्सेस, कंप्यूटर कोर्सेस, आई कंप्यूटर संस्थेच्या अंतर्गत अल्पदरात कोर्सेस सुरु केले. इतकेच नव्हे तर १२०० लोकांच्या उपस्थितीत युवा पिढ़ीसाठी कॉलेज विद्यर्थ्याच्या कल्याणार्थ पंकज यांनी १६ फेब्रुवारी २०२० साली करियर महोत्सवाचे भव्यदिव्य आयोजन ही केले. सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त जनतेला आशेचा किरण तेजवत त्यांनी माणुसकीला न्याय दिला. तसेच कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी व जनतेला लॉकडाउन काळात दुर्गम भागात अन्नदान , वस्त्रदान, किराणा वाटप व इतर मदत करुन कौतुकाची थाप मिळवली आहे.
कुणीतरी खरच म्हटले आहे जहा चाह वहा राह हे पंकज यांनी सिद्द केले आहे. समाजाला प्रेरणा ठरणाऱ्या समाजकार्याला व या जोशिल्या युवकाला मानाचा सलाम! समाजकार्याचा विडा उचलत जर कोणत्याही गरजूला पंकज यांची केव्हा ही गरज लागली तर कृपया त्यानी 8928555566 नंबरवर संपर्क करावा, असे वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला बुलंद पोलीस टाइम्स्‌शी बोलताना पंकज नाले यांनी सांगितले.आज पंकज नाले यांच्या वाढदिवसाच्यानिमित्त त्यांना बुलंद पोलीस टाइम्स्‌ परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here