धरणगाव (योगेश पी पाटील) – येथे लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात महात्मा फुले स्मारकाजवळ साजरा करण्यात आली. यावेळी गुलाबराव वाघ शिवसेना जिल्हा प्रमुख यांनी सांगितले की, कोरोना परीस्थितीत आपल्याला आण्णाभाऊ साठे यांची मिरवणूक काढुन जरी साजरा करता आली नाही, त्यांचे साहित्य व फकिरा कादंबरी विचार हे जरी घरा घरात पोहोचवले तरी जंयती साजरी केली असे होईल आणि लोकशाहीरी चा माध्यमातून समाज जागृतीचे महान कार्य आण्णाभाऊ साठे यांनी केले आहे. असे वाघ यांनी बोलताना सांगितले. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या शुभहस्ते पुजन करण्यात आले. यावेळी चर्मकार समाजाचे नेते भानुदास विसावे, सामाजिक समरसता मंच चे निमंत्रक महेश आहेराव,नगरअध्यक्ष निलेश चौधरी यांनी जंयती निमित्त मातंग समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या, या प्रसंगी महात्मा फुले बिग्रेड चा जिल्हा अध्यक्ष उषाताई वाघ ,भाजप चे गटनेते कैलास माळी सर, नगरसेवक अंजली विसावे, ललित येवले, कॉग्रेस युवक अध्यक्ष, गौरव चव्हाण विशाल लबोळे, रामचंद्र महाजन, माळी समाजाचे सचिव दशरथ महाजन , भोई समाज अध्यक्ष सुनिल जावरे, जितेंद्र बयस, कमलेश तिवारी, नितीन माळी, , सोमा चित्ते , संजय तोडे , प्रल्हाद जाधव, सुरेश चित्ते, फकीरा जाधव, टिनू गरुड व सर्व समाज बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन मातंग समाज सेवा मंडळा कडुन करण्यात आले होते. प्रास्ताविक व्हि टी माळी सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन समाजाचे अध्यक्ष रामा चित्ते यांनी मानले.
Home Uncategorized छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला पोवाडा लिहिणारे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे – गुलाबराव वाघ







