- चोपडा तालुका भाजपा व मित्रपक्षांकडून दूधाला अनूदान मिळण्यासाठी करण्यात आले आंदोलन
- अंकलेश्वर-बूरहानपूर महामार्गावर केला रास्ता रोको
- महामार्गावरील वाहतुक झाली होती ठप्प
चोपडा (संदीप ओली) – येथे भाजप व मित्रपक्ष यांनी संयुक्तरित्या दूध दरवाढीसंबंधी व इतर स्थानिक समस्यांकडे लक्ष वेधण्याकरीता
अंकलेश्वर-बुरहानपुर महामार्गावरील शहरातील पंकज नगर स्टॉप येथे रस्ता रोको करुन एल्गार आंदोलन करण्यात आले.
राज्यातील सत्ताधारी आघाडी सरकारने जनतेला वार्यावर सोडले आहे.दुध उत्पादकांसह राज्यातील सर्वच शेतकर्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.म्हणून अशा संकट काळात शेतकरी बांधवांना न्याय देण्यासाठी,झोपलेल्या आघाडी सरकारला जागे करण्यासाठी भारतीय जनता पाटीॅ व मित्र पक्षाच्या महायुतीतर्फे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. दुध उत्पादकांना सरसकट १० रूपये प्रति लिटर व दुध पावडरला प्रति किलो ५० रूपये अनुदान मिळायलाच पाहिजे या मागणीकरिता भारतीय जनता पार्टी,रिपाई आठवले गट,रासप,रयत क्रांती व शिवसंग्राम महायुतीच्या वतीने चोपडा येथे तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन सादर देण्यात आले आहे. 
गाईच्या दुधाला सरसकट १० रूपये/लिटर व दुध पावडरला ५० रूपये/किलो अनुदान देण्यात यावे,दुधखरेदी 30 रु.प्रति लिटरने करण्यात यावी,शेतकर्यांचा मागील वर्षी शिल्लक असलेला कापूस,मका,आणि ज्वारी लवकरात लवकर हमी भावाने खरेदी करुन दिलासा द्यावा,शेतकर्यांना युरिया व इतर खतांचा मुबलक पूरवठा करण्यात यावा,काळाबाजारी करणार्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी,कोरोना संकटकाळातील ताळेबंदी मधील तीन महिन्याचे अवाजवी आलेले विजबिल सरसकट माफ करावे, इत्यादी मागण्याचे निवेदन चोपडा भाजपा महायुतीकडून राज्य शासनाकडे मागणी करण्यात आली होती.तसेच मागणी मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता,कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या काळात शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पक्षामार्फत राज्य शासनाला निवेदन सादर करण्यात आले होते.परंतु गेंड्याच्या कातडी असलेल्या व झोपेचे सोंग घेतलेल्या राज्यातील सत्ताधारी महाआघाडी शासनाला शेतकरी बांधवांच्या,नागरिकांच्या वरील समस्या सोडवण्याची इच्छा दिसत नाही,म्हणून सरकारला वरील प्रश्नांवर जागे करण्यासाठी हे एल्गार आंदोलन करण्यात आले. आज रोजी सकाळी १० वाजता पंकज नगर स्टॉप येथे भाजपा महायुती मित्रपक्षांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले.सर्व ग्रामीण व शहरातील दुधसंकलन केंद्रे बंद ठेवण्यात आली.तसेच दूध टँकर अडवून रस्ता रोको करण्यात आला.व तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन देण्यात आले.याप्रसंगी भाजप जेष्ठनेते तिलक शहा,शांताराम पाटील, माजी पंचायत समिती सभापती आत्माराम म्हाळके, चंद्रशेखर पाटिल, विधानसभा संयोजक प्रदिप पाटील,माजी शहराध्यक्ष राजेंद्र शर्मा,सौ.ज्योती राकेश पाटील, सभापती महिला व बालकल्याण, जळगाव सौ.उज्ज्वला प्रशांत म्हाळके, कृषी व पशुसंवर्धन सभापती,जळगाव जि.प.सदस्य गजेंद्र पांडुरंग सोनवणे,उपसभापती पंचायत समिती भुषण भिल,तालुकाध्यक्ष पंकज सुभाष पाटील,शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल,संचालक कृ.उ.बा.समिती, धनंजय प्रभाकर पाटील,भरत बापूराव पाटील,मगन मुरलिधर बाविस्कर,हिंमतराव पाटील,सुतगिरणी संचालिका सौ.रंजना श्रीकांत नेवे,नरेंद्र पाटील,हनुमंत महाजन,चंद्रकांत धनगर,डॉ.मनोहर बडगुजर, प्रकाश पाटील,तुषार पाठक , भरत सोनगिरे,यशवंत जडे,मोहित भावे,जेष्ठ कार्यकर्ते पत्रकार अनिल पालिवाल,लक्ष्मण पाटील मुन्ना शर्मा,जे डी सोनार,बी एस महाजन,विजय बाविस्कर, धर्मदास पाटील,कमलेश मराठे भारतीय किसान संघाचे भगवान न्हायदे,कैलास पाटिल,रासपा चे नवल धनगर,हिम्मत पाटिल,पिंटू पावरा, भारतीय किसान संघाचे भगवान न्हायदे, कैलास पाटिल, रासपा चे नवल धनगर, हिम्मत पाटिल,पिंटू पावरा या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह्या असून निवेदन सादर करताना आंदोलनात शेकडोच्या संखेने मास्क लाऊन व सोशल डिस्टनसिंग ठेऊन भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होते. या आंदोलनाचे वेळी चोपडा शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक ठेंगे व एपीआय मनोज पवार, पो.ना.विलेश सोनवणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.







