धुळे (प्रतिनिधी) – येथील सप्तशृंगी महिला संस्थेची कर्मचारी ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्ण सेवा करताना स्वतः कोरोनाबाधित झाली. त्यांच्यामुळे परिवारातील मुलगी सोडली तर त्यांचा सगळा परिवार कोरोना बाधित झाला. पण त्या डगमगल्या नाही. तिने आणि तिच्या परिवाराने सरकारी दवाखान्यात उपचार घेतला ती आणि तिचा परिवार पूर्णपणे बरा झाला आणि आज ती परत नव्या जोमाने कामाला लागली.म्हणून आज त्यांचा संस्था अध्यक्ष मीना भोसले यांच्या हस्ते करोना योद्धा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.







