कोलंबो : भारत – श्रीलंका दौऱ्यातील टीम इंडियाची संकटांची मालिका संपतांना दिसतच नाही. पहिला टी – २० सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या सामन्यापूर्वी कृणाल पंड्या कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने, त्याच्या संपर्कातील ९ खेळाडू मालिकेतून बाहेर झाले. आता टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू दुखापतग्रस्त झाला असून, या दौऱ्यातून टीम इंडियाच्या बाहेर जाणारा तो दहावा खेळाडू असेल.
दुसऱ्या टी २० सामन्यात नवदीप सैनीच्या क्षेत्ररक्षण करताना खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला सामन्यामध्ये एकही षटक गोलंदाजी देण्यात आली नव्हती. टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी सैनीच्या दुखापतीबद्दल ताजी माहिती दिली आहे.
यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की, ‘सैनीवर आमच्या मेडिकल टीमचं लक्ष आहे. आम्ही परिस्थितीचा आढावा घेऊन त्याबबत योग्य निर्णय घेणार आहोत,’ असे म्हांब्रे यांनी सांगितले. मात्र सैनी ज्या पद्धतीनं तिसऱ्या ओव्हरमध्ये फिल्डिंग करताना मैदानावर पडला ते पाहाता तो शेवटच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे.






