मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा १४ दिवस न्यायालयीन कोठडीत आहे. फोर्ट कोर्टाने बुधवारी राज कुंद्राचा जामीन अर्ज फेटाळला आहे. असे असतानाच मॉडेल शर्लिन चोप्रा हिने त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा खळबळजनक आरोप केला आहे.
‘ईटाइम्स’च्या अहवालानुसार शर्लिनने एप्रिल २०२१ मध्ये कुंद्रावर लैंगिक अत्याचाराची एफआयआर दाखल केली होती. पोलीसांनी यानंतर गुन्हा दाखल केला आहे. शर्लिनने या प्रकरणात २०१९ च्या घटनेचा उल्लेख केला आहे. शार्लिन चोप्राने पोलिसांकडे दिलेल्या निवेदनात राज कुंद्रावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला. शार्लिन चोप्राचा असा दावा आहे की, राज दोन वर्षांपूर्वी २०१९ मध्ये अचानक तिच्या घरी आला आणि लैंगिक अत्याचार केला. शर्लिनचा आरोप आहे की कुंद्राने तिला जबरदस्तीने किस केले, तिला भीती वाटली.
याबाबत पोलिसांना माहिती देताना शर्लिनने सांगितले की, ‘राज कुंद्राने माझ्या बिझिनेस मॅनेजरला प्रपोजलसाठी बोलावले. २७ मार्च २०१९ रोजी झालेल्या बिझिनेस बैठकीनंतर राज कुंद्रा अचानक न कळवता माझ्या घरी आला. आमची फोनवर कोणत्या तरी मुद्यावरून चॅटिंगमध्ये वाद झाला होता. यानंतर कुंद्रा घरी पोहोचला आणि जबरदस्तीने किस करू लागला असा दावा शार्लिनने केला आहे. त्याला मागे खेचण्याचा खूप प्रयत्न केला. पण राजने ऐकले नाही. शर्लिन सांगते की या घटनेच्या वेळी ती खूप घाबरली होती. थोड्या वेळाने तिने कसं तरी राजला ढकलले आणि वॉशरूमच्या दिशेने पळाली.






