रायगडच्या अँटी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडियाच्यावतीने १४ जणांना कोरोनायोध्दा सन्मान

anti-corruption-foundation-of-india-raigad

अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) : आज बुधवार दि. २८/०७/२०२१ रोजी “अँटी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया” च्या रायगड टीमच्यावतीने कोरोना योद्धा म्हणून १४ जणांना सन्मानित केले

सर्व कोरोना योद्धा हे अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात कोरोना मध्ये मृत्यू पावलेल्या माणसांचे सर्व सोपस्कार पार पाडून त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्याचे काम अविरतपणे करणारे आहेत. जिथे सगेसोयरे देखील माघार घेतात असे जिकरीचे काम आपला जिव धोक्यात घालून संपूर्ण लाॅकडाऊन पासून हे सर्वजण करीत आहेत. नितीन अडसुळे, राजेंद्र गायकवाड, ओंकार आंबेरकर, महेंद्र पवार, स्वप्नील ओव्हाळ, प्रकाश तांबे, नितीन वाडेकर, विनायक पवार, शुभम गोरे, प्रतिक जाधव, प्रतिश नेने, अक्षय चव्हाण, आर्दश नेने, अजय कारंडे.या सर्वांचा कोरोनायोध्दा म्हणून सन्मान करण्यात आला.

यावेळी नॅशनल चिफ सेक्रेटरी धनंजय म्हात्रे, स्टेट प्रेसिडेंट (वुमन सेल) सौ. पल्लविका पाटील, डिस्ट्रिक्ट चिफ इनचार्ज प्रसन्नकुमार जैन, डिस्ट्रिक्ट चिफ डारेक्टर कनैह्या ठाकूर तसेच जिल्ह्यातील सर्व एक्झिक्युटिव्ह मेंबर्स व इतर उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here