जळगाव उपमहापौरांवर झालेल्या गोळीबाराच्या निषेधार्थ मराठा फाउंडेशनतर्फे पालकमंत्र्यांना निवेदन

gulabrao-patil-nivedan

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : येथील महानगरपालिकेचे उपमहापौर कुलभूषण पाटील हे दोन गटात क्रिकेटच्या खेळण्यावरून झालेला वाद मिटवण्यासाठी गेले असता एका गटातील कार्यकर्त्यांनी पूर्व वैमन्यस्यातून त्यांना शिवीगाळ केली त्यामुळे कुलभुषण पाटील हे तेथे वाद विवाद न करता तिथून निघून गेले त्यानंतर त्यांना फोन वर धमकी दिली की जीवे मारण्याची मग ही घटना घडली. काही वेळानंतर एका गाडीतून चार ते पाच व्यक्ती त्यांच्या घरी येऊन त्यांनी रिव्हॉलबर वरून चार फायर केल्या त्यात कुलभूषण पाटील यांना इजा झाली नाही ते सुदैवाने बचावले परंतु त्या व्यक्तीचा श्री पाटील यांना ठार मारण्याच्या कट होता.

या हल्याच्या जळगाव जिल्हा मराठा फाउंडेशन तर्फे जाहीर निषेध करण्यात आला. या संदर्भात ना.गुलाबराव पाटील यांना निवेदन देण्यात आले. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वलसे पाटील यांनासुद्धा निवेदन देण्यात आले.

निवेदन देताना पी एम पाटील सर जळगाव जिल्हा सकल मराठा समाज अध्यक्ष, गुलाबराव वाघ सहसंपर्कप्रमुख जळगाव,रमेश पाटील जळके, रवींद्र पाटील सर अंजनविहीरे,अरविंद मानकरी पाळधी,हेमंत चौधरी शिवसैनिक आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here