सावित्रीच्या कर्तबगार लेकींच्या पाठीवर पालकमंत्र्यांची कौतुकाची थाप !

धरणगावातील कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थीनींचा रोख पारितोषिकासह गौरव

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) : दहावीच्या परिक्षेत आपापल्या विद्यालयातून प्रथम आलेल्या विद्यार्थीनांच्या कर्तबगारीला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व शिवसेनेने येथे आयोजीत केलेल्या कार्यक्रमात रोख पारितोषीक आणि गौरव करून दाद दिली. याप्रसंगी आई-वडिल नसतांना दिव्यांग मावशीने शिकवलेल्या तरूणीला पालकमंत्र्यांनी २५ हजार रूपयांचे पारितोषीक देऊन गौरविले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ हे होते.

याबाबत माहिती अशी की, धरणगाव येथे शिवसेनेतर्फे विकासकामांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला. यात दहावीच्या नुकत्याच लागलेल्या निकालात आपापल्या विद्यालयातून पहिल्या आलेल्या विद्यार्थीनींचा शाल-श्रीफळ आणि पाच हजार रूपये रोख देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये प. रा. विद्यालयाची साक्षी रमेश काटवे; बालकवि विद्यालयाची पूजा विजय पाटील; इंदिरा कन्या विद्यालयाची दिव्या जनार्दन चव्हाण; अँग्लो उर्दू विद्यालयाची अंजुमन काझी; महात्मा फुले विद्यालयाची दिपाली दिलीप नेरकर या विद्यार्थीनींचा समावेश होता. तर याच कार्यक्रमात युवासेना युवती तालुका प्रमुख नेहा प्रकाश पाटील,हिचा देखील मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

दरम्यान, महात्मा फुले विद्यालयाची दिपाली दिलीप नेरकर या विद्यार्थीनीचे आईवडील ही दोन वर्षांची असतांनाच मयत झाले असून तिच्या दिव्यांग मावशीने मोलमजुरी करून तिला वाढविले. तिने जिद्दीने अभ्यास करून दहावीच्या परिक्षेत तब्बल ९४.२० टक्के मिळवून पहिला क्रमांक पटकावला. तिचे शिवसेने तर्फे सत्कार करण्यात आला. तर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तिच्या यशाचे कौतुक करत तिला पंचवीस हजार रूपये रोख इतकी रक्कम दिली. टाळ्यांच्या कडकटाटात सर्वांनी दिपालीचे कौतुक केले.

या प्रसंगी शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ,जिल्हा प्रमुख विष्णुभाऊ भंगाळे, तालुका प्रमुख गजानन पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर, उपजिल्हाप्रमुख पी. एम.पाटील सर ,नगराध्यक्ष नीलेश चौधरी,उपनगराध्यक्ष कल्पनाताई महाजन,माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, आघाडी जिल्हा संघटक महानंदाताई पाटील,जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी, उषाताई वाघ,कल्पना कापंडणे, जनाबाई पाटील,भारतीताई चौधरी,शहर प्रमुख राजेंद्र महाजन,उपतालुका प्रमुख राजेंद्र ठाकरे,मोती आप्पा पाटील, भगवान महाजन,न.पा. गटनेते पप्पू भावे,नगरसेवक वासुदेव चौधरी,भागवत चौधरी,अहमद पठान,किर्ती मराठे,अंजलीताई विसावे,रत्ना धनगर,नौशाद शेख,विलास महाजन ,विजय महाजन, जितेंद्र न्हायदे, भानुदास विसावे, अॅड शरद माळी, योगेश वाघ, धिरेंद्र पुरभे, दिनेश येवले, प्रशांत वाणी, रुपेश अमृतकर,किशोरी वाणी,डी.जे पाटील, महेंद्र चौधरी, भरत महाजन,रवीद्र जाधव,युवा सेना शहर प्रमुख संतोष महाजन,जीवन बयास, विनोद बयस, संजय लोहार,बालु जाधव,छोटू जाधव,योगेश पी.पाटील,वाल्मिक पाटील,लक्ष्मण माळी,राहुल रोकडे,तौसिक पटेल,हेमंत चौधरी,विनोद रोकडे,विलास पवार,सतिश बोरसे,अरविंद चौधरी,गोलु चौधरी, गोपाल पाटील,अमोल चौधरी,गोपाल चौधरी, सुकलाल चौधरी,दगडु चौधरी,शेख कालु,खालिक शेख,असलम शेख,सद्दाम शेख, वसीम पिजारी,विद्यार्थी सेना तालुका प्रमुख कमलेश बोरसे, यांच्यासह शिवसेना युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी धरणगाव शहरातील व परिसरातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर यांनी केले .सूत्रसंचालन उपशहर प्रमुख किरण अग्निहोत्री यांनी केले तर नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here