शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : न्याहाळोद ता. जि. धुळे येथील विधवा/अपंग/निराधार/श्रावण बाळ पेन्शन योजना त्वरित लागू करा. या मागणीसंदर्भात आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मोतीलाल सोनवणे, आंदोलन प्रमुख नामदेव येळवे, धुळे जिल्हा अध्यक्ष संजय दावळे, धुळे तालुका अध्यक्ष प्रा. संदीप तवर, धुळे जिल्हा संपर्कप्रमुख साहेबराव वाकडे, मनोज शिरसाठ, गणेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाने सोमवार दिनांक २६/७/२०२१ रोजी निवेदन सादर केले.
या निवेदना तर्फे अशी मागणी करण्यात आली की, न्याहाळोद ता. जि. धुळे येथील दिनांक २६/६/२०२१ रोजी आपल्या तहसील कार्यालयात अर्ज सादर केले आहेत. राज्यात उद्भवलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे कोणताही रोजगार उपलब्ध नाही. विधवा/ अपंग/निराधार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तरी विधवा अपंग निराधार यांना लवकरात लवकर पेन्शन चालू करा अशी चर्चा करण्यात आली. निवेदनाची दखल घेतो व लवकरात लवकर पेन्शन चालू करतो असे त्यांनी सांगितले.
यावेळी धनुबाई रघुनाथ बोरसे, नगुबाई मधुकर शिरसाठ, चंदनबाई विश्राम चव्हाण, सुमनबाई रमेश लोहार, सरस्वताबाई पंडित माळी, सिंधुबाई उखा वाकडे, मोतनबाई युवराज शिरसाठ, आशाबाई हिम्मतराव शिरसाठ, हौसाबाई सदाशिव आखडमल, मोतनबाई युवराज शिरसाठ, आशाबाई हिम्मतराव शिरसाठ, इंदुबाई बारकू भिल, इंदिराबाई दयाराम भिल, सायरा शमशुद्दिन खाटीक, कलाबाई भिका नवसारे, सीमा निंबा शिरसाठ, सुमनबाई भीमराव शिरसाठ, कमलबाई सुधाकर शिरसाठ, लक्ष्मीबाई दीपक कढरे, विमलबाई पुंडलिक कढरे, सुंदरबाई हरचंद कढरे, मनोहर गोरख काकुळदे, मिराबाई देविदास कढरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.






