टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूची उपांत्य फेरीत धडक

टोकियो : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने आपल्या आक्रमक खेळीने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुचीवर सहज सरशी साधत ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत धडक दिली आहे.

सिंधू आता सुवर्णपदकापासून फक्त दोन पाऊल दूर आहे. उपांत्यफेरीच्या लढतीत सिंधूसमोर ताई जू यिंग किंवा रत्नाचोक इंतानोन यापैकी एकजण आमनेसामने असेल. या स्पर्धेचा चौथा उपांत्यपूर्व सामना तैवानच्या ताई जू आणि थायलंडच्या इंतानोन यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकणारी खेळाडूच पी. व्ही. सिंधूला टक्कर देईल.

महिला एकेरीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत दोन चीनी खेळाडू चेन युफेई आणि ही बिंगझाओ यांच्यात सामना होईल. ही बिंगजाओने जपानच्या नोझोमी ओकुहाराला पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. चेन युफेईने कोरियाच्या एन से यंगचा पराभव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here