शेकापचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन

पनवेल (प्रतिनिधी विनया मेढेकर) : सांगोला विधानसभेचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. वयाच्या ९४ व्या वर्षी उपचारादरम्यान त्यांनी सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.

शेतकरी कामगार पक्षाकडून गणपतराव देशमुख यांनी सांगोला मतदारसंघात तब्बल अकरा वेळा आमदार होते. त्यांना राजकारणाचा दांडगा अनुभव होता. त्यांच्या निधनामुळे राजकीय विश्वावर शोककळा पसरली आहे.

आजारी असल्याने त्यांच्यावर १६ जुलैपासुन सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्यावर पित्ताशयातील खड्याची शस्त्रक्रियाही झाली होती. त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. शुक्रवारी रात्री सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटलमध्ये प्राणज्योत मावळली.

शेकापकडून १९६२ ला ते पहिल्यांदा विधानसभेत निवडून गेले. १९७२ व १९९५ चा अपवाद वगळता विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत विजयी झाले.अकरा वेळेस विधानसभा जिंकल्यामुळे वर्ल्ड गिनीज बुकमध्ये आबांच्या कारकिर्दीची नोंद झाली आहे. २०१९ विधानसभेची निवडणूक प्रकृतीच्या कारणाने त्यांनी लढविली नव्हती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here