नवी दिल्ली : ब्रिटनमधील न्यायालयाने माल्याला दिवाळखोर घोषित केले आहे. त्यामुळे स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या नेतृत्वातील बॅंक समूहाला आता माल्याच्या परदेशातील मालमत्ता जप्त करून कर्ज वसुली करता येईल. यावरूनच माल्याने उपहासात्मक टीका केली आहे.
आपल्या उपहासात्मक ट्वीटमध्य विजय माल्ल्या म्हणतो, पूर्ण कर्जवसुली केल्यानंतरही बॅंका अजूनही थकीत कर्ज असल्याचे म्हणतात. ‘आयडीबीआय’ बॅंकेने विजय माल्याला दिलेल्या संपूर्ण कर्जाची वसुली केल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. बॅंकेने ७.५ हजार कोटी रुपयांचे कर्ज वसूल केले आहे. या वृत्ताचे छायाचित्र जोडून माल्याने हे ट्वीट केले आहे.
And the Banks say I owe them money ! pic.twitter.com/XnWSjXnnF9
— Vijay Mallya (@TheVijayMallya) July 29, 2021
काही दिवसांपूर्वी माल्याने ‘ईडी’ने ६.२ हजार कोटींच्या कर्जवसुलीसाठी १४ हजार कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. तरीही बॅंका मला दिवाळखोर घोषित करण्याची मागणी न्यायालयाकडे करतात, हे अद्भुत आहे, या आशयाचे ट्वीट केले होते.
ED attach my assets worth 14K crores at behest of Govt Banks against debt of 6.2K crores.They restore assets to Banks who recover 9K crores in cash and retain security over 5K crores more.Banks ask Court to make me Bankrupt as they may have to return money to the ED. Incredible.
— Vijay Mallya (@TheVijayMallya) July 26, 2021
विजय माल्या २०१६ पासून ब्रिटनमध्ये वास्तव्यास आहे. किंगफिशर एअरलाईन्सला दिलेले ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून तो पळाल्याचा ठपका माल्यावर ठेवला आहे. त्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग ब्रिटनमधील एका गोपनीय प्रकरणामुळे थांबलेला आहे.






