पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज वितरण
जळगाव (क्राइम रिपोर्टर विकास फूलपगारे) : शिवसेना जळगाव महानगरतर्फे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त १६१ कोरोना योद्धाना १ वर्षाचे विमा संरक्षण देण्यात येणार असून त्याचे वितरण जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते आज (दि.३१) होणार आहे.
मागील वर्षभरापासून अनेक रुग्णवाहिका चालक खाजगी सुरक्षा रक्षक सफाई कर्मचारी व कोरोना काळात ज्यांनी योगदान दिले आहे असे १६१ कोरोना योध्याना १ वर्षाचे विमा संरक्षण देण्यात येणार आहे
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ माजी आमदार प्रा चंद्रकांत सोनवणे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे माजी महापौर श्री नितिन भाऊ लढा महापौर जयश्री महाजन महानगर प्रमुख शरद तायडे सुरेश चौधरी माजी नगराध्यक्ष धरणगाव विरोधी पक्षनेते सुनील महाजन आदी उपस्थित राहणार आहेत उपस्थिती चे आवाहन उप महानगर प्रमुख प्रशांत सुरेश सुरळकर यांनी केले आहे






