चांदवड नगरपरिषदेने शहरात घरोघरी सर्वेक्षण व फवारण्या करणे आवश्यक

चांदवड (विशेष प्रतिनिधी) : चांदवड शहरा नजीकच्या काही भागांमध्ये डेंग्यू व चिकणगुनियाची साथ सुरू आहे.उमराणे परिसरात सुद्धा जोरदार फवारण्या सुरू आहेत तेथे डेंग्यू व चिकणगुनिया चे रुग्ण आढळत आहेत.

चांदवड शहरातील नाल्याकाठच्या भागांमध्ये अस्वच्छ पाण्यामुळे व घाणीमुळे डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.काही नागरिकांना ताप व डोकेदुखीचा त्रास होत असून शहरात डेंग्यू सदृश परिस्थिती निर्माण होण्याची वाट न पाहता चांदवड नगरपरिषद स्वच्छता व आरोग्य विभागाने शहरात डासांवर फवारणी व घरोघरी ताप ,सर्दी व इतर रुग्ण आहेत का याचे सर्वेक्षण करणे गरजेचे आहे अशी मागणी आता नागरिक करीत आहेत.

काही दिवसांपूर्वी सुरू झालेली फवारणीमध्येच स्थगित झाली होती मात्र चांदवड नगरपरिषदने आता तरी झोपेचे सोंग न घेता फवारण्या करणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here