वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून सोनसाखळी चोर पसार

पनवेल (प्रतिनिधी विनया मेढेकर) : मोटारसायकलवरुन येवून रस्त्याने पायी निघालेल्या एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून चोर पसार झाल्याची घटना पनवेल शहरातील शिवाजी चौक परिसरात घडली आहे. याप्रकरणी दोन अज्ञात चोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. 31 जुलै रोजी श्रीमती सुशिला तेलंगे (वय 69) नामक वृद्ध महिला मिडल क्लास सोसायटीतील वास्तू संकल्प या बंगल्यासमोरुन गांधी हॉस्पिटलकडे जाणार्‍या रस्त्याने पायी निघाल्या होत्या. यावेळी भरधाव वेगाने येणार्‍या मोटारसायकलवरुन दोन अज्ञात चोरांपैकी एकाने सुशिला तेलंगे यांच्या गळ्यातील ७० हजार रुपये किंमतीची सोन्याची चेन खेचून ते दोघे पसार झाले आहेत.

सुशिला तेलंगे यांनी याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल पोलीस या दोन अज्ञात चोरांचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here