शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : महात्मा फुले कृषि विद्यापीठ संलग्न सेवा संस्कार संस्थेचे श्रमशक्ती कृषि महाविद्यालय, मालदड तालुका संगमनेर महाविद्यालयाची विधार्थिनी कृषी कन्या कु, निकम शुभांगी नामदेव हिने ग्रामीण कृषि जागरूकता आणि औधोगिक कार्यानुभव कार्यक्रमाला सुरवात केली
कार्यक्रमाचे प्रारंभी शिर्डी विकास सोसायटीचे माजी चेअरमन श्री विनायकराव कोते,संपतराव कोते,अरविंद कोते,प्रविण कोते वैष्णव कोते. तसेच इतर शेतकरी उपस्थित होते
त्यानंतर शेतकरी श्री अक्षय कोते यांचा शेतात जाऊन पिकांचा आढावा घेतला पिकातील होणारा बदल , माती परीक्षण , शेंद्रिय पीक पद्धती , बी-बियाणे , औषध फवारणी , आदी विषयावर मार्गदर्शन केले. तसेच पशु पालन एक जोड धंदा म्हणून कसा करता येईल याची माहिती सांगितली. सर्व शेतकऱ्यांनी धन्यवाद दिले.
कृषि कन्या या उपक्रमासाठी श्रमिक उदयोग समूहाचे आध्यक्ष श्री साहेबराव नवले,डॉ. अरविंद हारदे,डॉ.अशोक कडलग,प्रा.निलेश तायडे,शेडगे मॅडम सर्व विषय तज्ञांचे मार्गदर्शन लाभले.





