महाराष्ट्र (सहसंपादक मनोज सोनवले) : राज्यमंत्री गृह (शहरे), गृहनिर्माण,परिवहण माहिती व तंत्रज्ञान, संसदीय कार्य,माजी सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र शासन पालकमंत्री, कोल्हापूर ना.सतेज उर्फ बंटी पाटील यांना त्यांच्या इचलकरंजी नगरपालिका भेटीदरम्यान शनिवार दि.३१ जुलै रोजी इचलकरंजी नगरीचे उपनगराध्यक्ष तथा पक्षप्रतोद..भा.ज.पा. तानाजी पोवार यांनी विविध मागण्यांचे निवेदन दिले.
या निवेदनात इचलकरंजी पोलिस स्टेशनच्या ताब्यात असलेली इचलकरंजी नगरपालिकेची इमारत नगरपालिकेस परत मिळणे तसेच लाड समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या नियुक्त्यांबाबत वारसा हक्काची अंमलबजावणी पुढे चालू ठेवण्याबाबत झालेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील शासन निर्णयात सुधारणा होणे याबाबत प्रमुख विषय मांडण्यात आले होते.
त्याचप्रमाणे इचलकरंजी नगरपालिकेचे जवळपास गेल्या २ वर्षापासून कपात होत असलेले सहाय्यक अनुदानाचे १०० कोटी रक्कम प्रलंबित आहे,तरी ती रक्कम महाराष्ट्र शासनांकडून तात्काळ इचलकरंजी नगरपालिकेस अदा करणेत यावी. जेणेकरून शहरांतील विकासकामे त्याचबरोबर नगरपालिकेच्या सेवानिवृत्त आणि मयत कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती नंतरचे आर्थिक लाभ देणेचा महत्त्वपूर्ण प्रश्न निकाली लागेल या महत्वपूर्ण .सविस्तर मांडणी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांनी इचलकरंजी नगरपालिकेच्या बैठकीवेळी आपल्या प्रास्ताविकात केली.






