जळगाव : दुकानात चोरी करणारे दोघे चोरटे गजाआड

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर असलम खान) : शहरात दुपारी ४ वाजतेनंतर लॉकडाउनमुळे दुकाने बंद असल्याची संधी साधत दुकानंमध्ये चो-या होण्याचे प्रमाण वाढले होते, तशा अनेक तक्ररारी शहर पोलिसांकडे आल्या होत्या.

त्या अनुषंगाने जळगाव शहर पोलिसांचे गुन्हे शोध पथक कार्यरत होते. दुकानांमधील चोरी केलेल्या मालाची विक्री चोरटे करत असल्याची माहिती मिळाल्यावरून निलेश सुरेश वाणी, अणि चेतन दिलीप चौधरी, ( दोन्ही रा. कांचन नगर जळगाव.) यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.

जळगाव शहर पोलिस स्टेशनला भाग -५ ,गु.रा.नं. २४७/२१ भा.द.वि. ४५४, ४५७, ३८९, नुसार दाखल खुन्हयातील मुद्देमाल दोघांनी काढुन दिला आहे, पो. नि. लीलाधर कानडे, यांच्या मार्गदर्शन खाली. पो, कॉ, तेजस मराठी, योगेश इनधाड़े, पो,हे, कॉ,अक्रम शेख, पो.ना. भास्कर ठाकरे, पो,ना. किशोर निकुंभ, पो ना. गणेश पाटील, पो. कॉ, रतन गीते, आदिंनी या तपास कामात सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here