जळगाव : हरीविट्ठलनगरातील बेपत्ता मुलगी सापडली

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर असलम खान) : शहरातील दिनांक 23-7-2021 रोजी डॉ ज्योति गाजरे यांचे हॉस्पिटल मधील सफाईचे काम करणारी गतिमंद मुलगी गायत्री (वय 14) हीस दुपारी 12 वाजता दवाखान्यातुन कोणीतरी अज्ञात इसमाने पळवुन नेली.

याबाबत तिची आई सीमा सुरेश खैरनार,रा. हरी विठ्ठलनगर यांना जळगाव जिल्हा पेट पुलिसस्टेशनला रात्रि 22:40 वा फिर्याद दिल्यावरुन जिल्हा पोलीस स्टेशनला भा.द.वि. 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास शेडे यांनी दिलेल्या सूचनावरुन रात्र गस्त चेकीग सहा. फौजदार सतीश सुरडकर, व कर्मचारी पो. कॉ. छगन तायडे, पो कर्म रविद साबडे, अशोक संगत, व अतुल महाजन, यांनी संपूर्ण परिसर पिंजून, काढला.

जिल्हयातील रामानंद, एमआयडीसी, तसेच जळगाव तालुका पो. कॉ. पोपट सोनार, महिला पुलिस नाइक जय श्री मालखेड़ी, व. पो. कॉ. अशोक महाले, यांना सदरची मुलगी ही त्यांच्या हद्दीत मिळुन आली. त्यांनी तिला जिल्हापेठ पोलीस स्टेशनला आणून तिच्या आई वडीलांकडे सुपूर्द केले. तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासातच पोलीस कर्मचाऱ्यांनी या मुलीस शोधून केलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप चंदेलकर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here