टोकियो : जगभरातील सर्व क्रीडाप्रेमींचे लक्ष लागून असणारी ऑलिंम्पिकमधील १०० मीटरची शर्यत इटलीच्या लामोंट मार्सेल जॅकोब्सने जिंकली. जमैकाचा महान धावपटू आणि मानवी इतिहासातील सर्वात वेगवान माणूस उसेन बोल्टनंतर ऑलिम्पिक १०० मीटर शर्यत कोण जिंकणार याचीच वाट सगळे पाहत होते.
इटलीच्या लामोंट मार्सेल जॅकोब्सने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये १०० मीटर शर्यतीत सुवर्ण जिंकत इतिहास रचला आणि महान धावपटू उसेन बोल्टला त्याचा उत्तराधिकारी मिळाला. अतिशय रोमांचक ठरलेल्या या शर्यतीत फ्रेड केर्लीने रौप्य पदक, तर आंद्रे डी ग्रासेकडे कांस्य पदक गेले.
1 August – #Athletics– Men's 100m Final
🥇Marcell Jacobs 🇮🇹
🥈Fred Kerley 🇺🇸
🥉Andre De Grasse 🇨🇦#UnitedByEmotion | #StrongerTogether | #Olympics | #Tokyo2020— #Tokyo2020 (@Tokyo2020) August 1, 2021
गेल्या तीन ऑलिम्पिकमध्ये जमैकाच्या उसेन बोल्टने एकहाती सत्ता राखली होती. त्याने निवृत्ती घेतल्यानंतर नव्या चॅम्पियनच्या शोधात सगळे होते. दरम्यान, जॅकोबने या वर्षीच्या मे महिन्यात ९.९५ सेकंद वेळ नोंदवत नवा इटालियन विक्रम केला होता.






