शिर्डीत भाजपच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री.राजेंद्र गोंदकर पा. यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं शिर्डी शहरात आयोजित करण्यात आला होता.

यावेळी नंदकुमार जेजुरकर प्रदेश चिटणीस ओबीसी मोर्चा, शब्बीर भाई सय्यद प्रदेश कार्यकारणी सदस्य अल्पसंख्यांक मोर्चा, आकाश अडांगळे सरचिटणीस भारतीय जनता युवा मोर्चा शिर्डी शहर, अक्षय मुळे सचिव भाजपा युवा मोर्चा शिर्डी शहर, सागर जाधव सोशल मीडिया प्रमुख भाजपा युवा मोर्चा शिर्डी शहर, विशाल पवार सोशल मीडिया प्रमुख भाजपा युवा मोर्चा शिर्डी शहर, तुषार महाजन अध्यक्ष युवा वॉरियर्स शिर्डी शाखा क्रमांक दोन, सागर बेलदार अध्यक्ष युवा वॉरियर्स शाखा क्रमांक एक या नवनियुक्त पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ पार पडला. तसेच राजेंद्र बर्डे खावटी अनुदान योजनेत शेवटच्या घटकापर्यंत मदतपोहचण्यास विशेष सहकार्य केल्याबद्दल यांचा ही सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना ते म्हणाले भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा संघर्षातूनच तयार झालेला आहे. त्याला संघर्ष नवा नाही. तो येणाऱ्या अडचणींमधुनच संधी शोधत असतो. राष्ट्र सर्व प्रथम या भावनेतून तो नेहमी राष्ट्रसेवे साठी तत्पर असतो असे प्रतिपान जिल्हाध्यक्ष श्री. गोंदकर यांनी केले. पुढे बोलताना ते म्हणाले, जगातील बलाढ्य महाशक्ती देशांना त्यांच्या नागरिकांना मोफत लसीकरण करायला जमले नाही. पण आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी देशात नागरिकांसाठी मोफत लसीकरण चालु केले. गरीब जनतेचे या काळात हाल होऊ नये म्हणुन ८० करोड हून अधिक जनतेला नोव्हेंबर महिन्यापर्यंत मोफत अन्न धान्य केंद्र सरकार देत आहे. याच बरोबर आदरणीय मोदीजी यांनी अनेक महत्वाकांक्षी योजना देशात लागु केल्या. आदरणीय पंतप्रधान हे आपल्या देशाला प्रगती पथावर घेऊन जात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाची जगभरात एक महत्त्वपूर्ण ओळख निर्माण झाली आहे. हे सर्व शक्य झाले ते सर्व जनतेच्या पाठिंब्यामुळे व बहुमतात असलेल्या आपल्या सत्तेमुळे असे त्यांनी सांगितले.

ज्या प्रमाणे देशात आपले सरकार बहुमतात आहे. त्यामुळे निर्णय घ्यायला सोपे जाते. त्याच प्रमाणे आपले राज्यात ही आपले लवकरच स्वबळावर बहुमताचे सरकारला येईलच. प्रदेशाध्यक्ष आदरणीय आ.श्री.चंद्रकांतदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेले डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी समर्थ बूथ अभियानाला १ ऑगस्ट पासुन प्रारंभ झाला आहे. हे अभियान १५ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. या काळात राज्यातील ९८ लाख हून अधिक बूथ वर प्रत्येकी ३० कार्यकर्त्यांची एक टीम तयार करून त्याची यादी तयार करून आदरणीय पंतप्रधान मोदीजींच्या वाढदिसानिमित्त त्यांच्या कडे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आ.श्री. चंद्रकांतदादा पाटील हे सुपुर्द करणार आहेत. या काळात प्रत्येक बूथ असा मजबुत होईल की प्रत्येक बूथ वर भारतीय जनता पार्टी ला ५१% हून अधिक मते मिळतील.

येत्या काळात पक्षावर येणाऱ्या सर्व आव्हानांवर हेच उत्तर ठरणार आहे असेही यावेळी श्री.गोंदकर यांनी सांगितले. याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य किरण बोराडे, भाजपा जिल्हा कोषाध्यक्ष रमेश बिडये, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुनील लोंढे, सचिन भैरवकर, राहता तालुका ओबीसी मोर्चा अध्यक्ष स्वानंद रासणे, भाजपा शहर उपाध्यक्ष सुधिर शिंदे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस नरेश सुराणा, भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस सोमराज कावळे, भाजपा युमो शहराध्यक्ष योगेश गोंदकर यांसह आदी पदाधिकारी सह कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here