भगवद गीता ग्रंथ हा सर्व ग्रंथांचा पाया, कळस व आत्मा आहे – हभप अशोक महाराज शिंदे

भगवद गीता

पारनेर (उपसंपादक दिपक वरखडे) | भगवद गीता हा पवित्र ग्रंथ सर्व ग्रंथांचा पाया , कळस व आत्मा असल्याचे स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे सांगितल्या ची माहिती प्रसिद्ध किर्तनकार हभप अशोक महाराज शिंदे यांनी सांगितले .

श्री क्षेत्र रांधे नगरी येथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या निमित्ताने सुरू झालेल्या दुसऱ्या दिवशी च्या श्री स्वामी कथेचे पुष्प गुंफताना प्रसिद्ध किर्तनकार हभप अशोक महाराज शिंदे म्हणाले की , स्वामींची कथेने देव , संत होता येते , नामस्मरणाने माणूस होता येते . संत जन्माला येतात , ते जगाच्या कल्याणा करिता . धर्माला ग्लानी आली , भक्तांवर संकट आले की , देवाला जन्माला यावे लागते , तर माणसाला जन्माला यावे लागते , ते वासना व कर्मासाठी . स्वामी समर्थ महाराजांनी कर्दळी वनात ३०० वर्षे तपश्चर्येला बसले होते , तदनंतर त्यांचा जगाच्या कल्याणासाठी जन्म झाला . संत तुमच्या सारखेच असतात , पण त्यांच्यात व आपल्यात खूप तफावत आहे . आपल्या जीवनातील सुख व दुःख दुसऱ्याला सांगू नका . कारण तो दुसऱ्याला हसून सांगेल . सांगायचे च असेल , तर श्री स्वामी समर्थ महाराजां ना सांगा . श्री हे नाव कोणाला ही लावता येत नाही . कारण श्री म्हणजे स्वयं , समर्थ होय . स्वा म्हणजे समर्पण करणे , मी पणा समर्पण केलेले , स्वामी होय . अहंकार केला आणि तुका म्हणे देव पणा आला . स्वामीं च्या पुढे जाताना नम्रतेने गेले पाहिजे . त्यांनी मी पणाचा समर्पण केले , म्हणून ते स्वामी झाले . सर्व ग्रंथांचा पाया म्हणजे भगवत गीता आहे , तर सर्व ग्रंथांचा कळस आहे , तर सर्व धर्माचा आत्मा आहे . ज्याच्या अंगी सामर्थ्य आहे , ते समर्थ आहे . स्वामींची सेवा करण्याचे कारण म्हणजे ते भक्तांनी मागितले ते त्यांना देतात . भाव हा सात्विक अंतकरणाचा पाहिजे , तो असेल तर स्वामी ही दर्शन देतील . प्रत्येका मध्ये संत भरलेले आहेत , फक्त ते कळले पाहिजे . देवाला भेटण्यासाठी व्याकूळ व्हावे लागते , एवढे ते सोपे नाही . संत महात्मे कधी ही एका जागेवर थांबत नाही . प्रत्येकाच्या घरात स्वामीं चा फोटो पाहिजे , प्रत्येक घरावर लिहिले पाहिजे , हे घर स्वामींचे आहे . या कलीयुगात खूप साधू झाले आहेत . मोठे व्हायचे खूप अवघड आहे , त्याला यातना ही खूप आहेत . जोपर्यंत लहान आहेत , तो पर्यंत ठिक आहे . होते तो पर्यंत कोणी विचारले नाही . पण आज त्याच संतां करिता आज ही लोकं तासन तास उभे राहतात . जोपर्यंत माणूस आहे , तो पर्यंत त्यांची किंमत नसते .
आपल्या सुखात व दुःखात स्वामी येतात . संतांचा स्पर्श झाला तरी आपला उद्धार आहे . लांबच्या माणसा पासून सावध राहू नका , तर जवळच्या माणसा पासून सावध रहा . गुढी पाडवा म्हणजे नवीन वर्षे . निस्सीम भावनेने सेवा केल्याने स्वामी तुमच्या मागे उभे आहेत , असे हभप अशोक महाराज शिंदे म्हणाले .
यावेळी श्री स्वामी कथा सुरू होताना प्रथम श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचा सर्व भाविक भक्तांनी जप केला . अतिशय छान साथ संगतीने या स्वामी कथेला सुरुवात करण्यात आली , ती अखेर पर्यंत राहिल्याने कथा अतिशय श्रवणीय होत आहे.उपस्थित भाविक भक्त मोठ्या भक्ती ने व श्रद्धेने स्वामी कथा भजन गात , टाळ्या वाजवत श्रवण करत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here