सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील फार्मसी महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न

सहकार महर्षी किसनराव वराळ

पारनेर (उपसंपादक दिपक वरखडे) | सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील शिक्षण संस्थेत आयोजित तीन दिवसीय स्पोर्ट्स डे, पारंपरिक दिवस, मिस-मॅच डे व बॉलिवूड डे या विविध उपक्रमांचा समारोप मोठ्या उत्साहात करण्यात आला. या समारोप कार्यक्रमात संस्थेचे सचिव विराज वराळ पाटील यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत आनंदात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती बबुशा वरखडे होते. वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी व उपस्थित मान्यवरांनी सचिव विराज वराळ पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून केक कापून आनंद व्यक्त केला.
या निमित्ताने विद्यार्थ्यांकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गाणी, नृत्य, अभिनय व विविध कला आविष्कार सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. पारंपरिक दिवस, मिस-मॅच डे व बॉलिवूड डे या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा व विविध वेशभूषा सादर करून कार्यक्रमात सहभाग नोंदविला.
स्पोर्ट्स डे अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. धावण्याच्या स्पर्धा, संघात्मक खेळ व इतर क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.या प्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व, व्यावसायिक शिक्षणाची गरज व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उपलब्ध संधींचा उपयोग करून जीवनात प्रगती साधावी याबाबत मार्गदर्शनपर भाषणे केली. शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते व समाजाच्या विकासातही त्यांचा सहभाग वाढतो, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष रंगनाथ वराळ पाटील , संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशन चे अध्यक्ष सचिन वराळ पाटील , सरपंच चित्रा वराळ पाटील , उपसरपंच ज्ञानेश्वर वरखडे , माजी सदस्य भिमराव लामखडे , डॉ .गेणूजी शिंदे, हेमलता शिंदे, राळेगण थेरपाळ चे सरपंच पंकज कारखिले , अप्पासाहेब वराळ पाटील , सोमनाथ वरखडे , प्राचार्य डॉ. कुलदीप वैद्य, उपप्राचार्या रेश्मा पवार , महाराष्ट् राज्य पत्रकार संघाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश खोसे पाटील , निघोज शहराध्यक्ष पत्रकार सचिन जाधव, पत्रकार संतोषराव इधाटे , संदीप इधाटे , विलासराव हारदे , सुरेश वराळ , शिक्षक , कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांसाठी सुग्रास भोजनाची व्यवस्था करण्यात आली. विद्यार्थ्यांनी व मान्यवरांनी एकत्र भोजन घेत आनंद व्यक्त केला. कार्यक्रम मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.गौरवमुर्ती सचिव विराज वराळ पाटील यांनी आभार मानताना सध्या सुरू असलेल्या फार्मसी महाविद्यालया त अनेक विदयार्थी परिपूर्ण शिक्षण घेत असून आगामी काळात मेडीकल कॉलेज साठी ही प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here