देव व संत आपल्या उद्धार करण्यासाठी कधी ही दर्शन देतील – हभप अशोक महाराज शिंदे

देव व संत

पारनेर (उपसंपादक दिपक वरखडे) | देव व संत भक्ताच्या घरी कधी ही व कोणत्या ही रुपात उद्धार करण्यासाठी येतील, असे भावोद्धागार प्रसिद्ध किर्तनकार हभप अशोक महाराज शिंदे यांनी व्यक्त केले .

रांधे येथे स्वामी प्रकट दिनाच्या निमित्ताने सुरू झालेल्या प्रसिद्ध किर्तनकार हभप अशोक महाराज शिंदे यांच्या सुश्राव्य वाणीतील श्री स्वामी कथेच्या पहिल्या दिवसाचे पुष्पात ते म्हणाले की , रांधे नगरीत सुरु झालेला हा सोहळा साक्षात अक्कलकोट येथे सुरु असल्याचे वाटते , याला कारणीभूत संस्थापक अनिलराव आवारी हे होत . असा सोहळा पुन्हा पुन्हा पाहायला मिळणार नाही . आज आपल्या जीवनातील सोन्याचा दिवस असून आपण आकंठ पणे स्वामी नामात दंग आहोत . रांधे नगरीला श्री स्वामी समर्थ महाराजां चे मंदीर उभे राहिल्याने या गावाला श्री क्षेत्र रांधे नगरी म्हणून ओळखू लागले . ज्या भूमीला संतांचे पाय लागतात , ती भूमी पवित्र होते . स्वामी चे वाक्य आहे , तू भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे , त्याच पद्धतीने कार्य करा , काहीही अडचण येणार नाही . देवापेक्षा संतांना खूप मोठे महत्त्व आहे , देवांना प्रसन्न करायचे असेल तर प्रथम संतांची सेवा करा . स्वामींची कथा सामान्य नाही , ही कथा श्रवण केल्याने देव होता येईल . स्वामींचे पारायण वाचता येत नसले तरी फक्त बोटे फिरवल्याने पारायण समजते . प्रत्येकाला सुख , समाधान मिळावे म्हणून आपण भक्ती , सेवा करतो . संत , देव भेटणे सामान्य नाही .
अनुसूया माता पतिव्रता होती . ती निस्सीम विश्वासाबरोबरच मोठ्या भक्ती भावाने श्रद्धा , सेवा करत होती . तिची देवावर सत्ता होती . पत्नी चे आयुष्य पतीविना जगणे सोपे नाही . प्रत्येक गावात एक एक नारद आहे . त्यांचे काम च आहे कळ लावणे होय . त्यांचे चांगल्या कामांना विरोध करणे हे होय .चांगल्या रस्त्याला गतीरोधक व चांगल्या व्यक्तीला विरोधक असतात , पण आपण थांबायचे नसते , त्यांना एक दिवस स्वामी धडा शिकवतील . स्त्री हट्ट , बाल हट्ट पुर्ण करावाच लागतो . देव , संत कोणत्या रूपाने व कधी ही येतील , आपल्याला कळणार नाही . ते आपले उद्धार करण्यासाठी येतात . काही अडचण असेल तर स्वामींवर सोडा . जसा वारकरी संप्रदाय मोठा आहे , तसा दत्त संप्रदाय ही खूप मोठा आहे . संत कोठेही जन्माला येत नाही .स्वामींच्या मंदिराचा कळस जरी पाहिला , तरी मोक्ष प्राप्त होतो , असे ही हभप अशोक महाराज शिंदे यांनी सांगितले .

काल सोमवार पासून सुरू झालेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनावरील कथेला भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित होत व भक्ती भावाने तल्लीन होत आणि श्री स्वामी नाम घेत मोठ्या श्रद्धेने कथा श्रवण केली . या वेळी स्वामींची भावगीते , भजने गात या कथे ला रंगत आणली गेल्या ने परिसर भक्ती मय वातावरणात चिंब भिजून गेला .
स्वामी कथेच्या वेळी एक छोटा बालक स्वामी समर्थ महाराजांच्या वेशभुषेत उपस्थित महिला व पुरुष भाविक भक्तांच्या मध्ये फिरत मंचकावर स्थानापन्न झाले , तर एक लाकडतोड्याच्या रुपात एक छोटा बालक यावेळी उपस्थित झाल्याने जणू स्वामी समर्थ महाराज या स्थळी अवतरले की काय ? असे वातावरण निर्माण झाले.
श्री क्षेत्र रांधे नगरी येथील श्री स्वामी समर्थ देवस्थान चे संस्थापक अनिलराव आवारी , अध्यक्ष सुभाषराव भोसले यांच्या नेतृत्त्वाखालील भाविक भक्तांनी मोठया श्रद्धेने या भक्तीमय कार्यक्रमाला मनापासून वाहून घेत हा श्री क्षेत्र रांधे नगरी येथे यशस्वी पणे करण्याचा संकल्प केला . त्याला ही भाविक भक्त ही मोठ्या संख्येने उपस्थिती लावत अगदी तल्लीन होत सहभाग घेत आहे .

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here