सातारा (प्रतिनिधी दिनेश लोंढे) : दि. ८ ऑगस्ट २०२१ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र त्यादिवशी काही जिल्ह्यात केंद्र शासनामार्फत सेंट्रल आर्म फोर्स या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार असल्याने शिष्यवृत्ती परिक्षा स्थगित करण्यात आली होती.आता पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. आठवीची परीक्षा दि. ८ ऑगस्ट २०२१ ऐवजी दि. ९ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात येणार आहे, असे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद सातारा यांनी कळविले आहे.






