मुंबई-परेल (प्रतिनिधी) : कोरोना सारख्या महामारीला सामोरे जात नाही तोच आता सध्याच्या कोकणातील ओढावलेल्या पूरमय अवस्थेमुळे कोकणातील महाड ते चिपळूण शहरातील काही कुटुंबे उध्वस्त झाली आहेत… आपला कोकणी माणुस बेघर झालेला आहे तेव्हा त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली जावी या उद्देशाने परेल येथील डॉ. शिरोडकर शाळेच्या दुपार अधिवेशनच्या माजी विद्यार्थ्यानी आपल्या १९८८ व्हाटसअप समुहातर्फे पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात दिला आहे.
कोकणातील महाड ते चिपळूण मधील इंदिरा हाउसिंग ते डांगे बंगला आदी ठिकाणी उद्भवलेल्या पूरमय परिस्थितीतील पूरग्रस्त जनतेला मदतीचा हात म्हणून ब्लँकेट, चादर, टॉवेल, वनस्पती तूप, चटई, नवीन कपडे, फिनेल तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून आपले कर्तव्य पालन केले आहे.


याप्रसंगी प्रतिभा गायकवाड, नेत्रा पाष्टे, संतोष जैतापकर, वनमाला कोचरे, महेश्वर तेटांबे, श्रीकांत आयरे, संजय गवाणकर, देवीदास लुडबे, राजेश विनायक कदम, अजित साकरे, गणेश अग्रवाडकर, सुरेश गुरव, देवेंद्र पेडणेकर, संतोष नाटाळकर, सुनिल कडू, श्याम करंगुटकर, रणजित घोसाळकर,विनायक हळदणकर, स्मिता राणे, विवेक कौर, मनिष टिपरे, स्वाती दळी, योगेश मोर्डेकर,नीता कदम, सोनल सावंत, दीपाली विचारे, प्रणाली, संतोष यादव, सुनिता वेंगुर्लेकर, योगेश शिरकर, स्वाती नाईक, शेखर परब, नितीन कासारे, अनिल पुरळकर आदी सर्व माजी विद्यार्थ्यानी आपापल्या परीने योगदान देऊन आपले दातृत्व सिद्ध करून आपले कर्तव्य बजावले आहे.






