मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे कोल्हापूर विमानतळावर स्वागत

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आज सकाळी कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी कृषी, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्री महोदयांचे स्वागत केले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, खासदार धैर्यशील माने, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, विमानतळ प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया, माजी आमदार उल्हास पाटील, प्रा.नितीन बानूगडे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

udhav-thakare-ar-kolhapur-airport

सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सांगली जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. कोल्हापूर विमानतळावर येवून त्यांनी मोटारीने सांगलीकडे प्रयाण केले.

सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. पलूस तालुक्यातील भिलवडी व अंकलखोप नंतर मौजे डिग्रज या पुरबाधित गावांची पाहणी करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागरिकांशी संवाद साधणार आहेत. तसेच सांगली येथील आयर्विन पुल, हरभट रोड येथील पुरामुळे बाधीत भागाची ते पाहणी करतील. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात पूरपरिस्थितीबाबत आढावा बैठक घेणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here