आ. समीर कुणावारांचे प्रयत्नामुळे नागपुर एनडीआरएफने राबविली शोधमोहिम..
हिंगणघाट ( प्रतिनिधी आसिफ कुरेशी) : शहरातील विवेकानंद वार्ड येथील रहिवासी नरेश विठ्ठलराव वानखेड़े(४८) हा भोई समाजाचा इसम दि.२९ जुलै रोजी वणा नदीतील स्मशानेश्वर महादेव परिसरातुन वाहुन गेला होता.आज दि.२ रोजी त्याचा वणा नदी रेल्वेपुला जवळ मृतदेह सापडला.
पोलिस व महसुल प्रशासनाने शोध घेऊनही सदर इसमाचा शोध लागला नव्हता, स्थानिक भोई समाजाचे युवकांनीही यासाठी यासाठी ४ दिवस प्रयत्न केले होते,परंतु प्रशासन हतबल झाल्यानंतर यासाठी स्थानिक आमदार समिरभाऊ कुणावार यांनी विशेष प्रयत्न करुन एनडीआरएफ चमुला पाचारण केले,यासाठी राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनीसुद्धा मदत केली.







