जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : शहर महानगरपालिकेतील काही कर्मचारी आज शनिवार, दि. 31 जुलै 2021 रोजी सेवानिवृत्त झाले. या पार्श्वभूमीवर त्यांचा काल शुक्रवार, दि.30 जुलै 2021 रोजी महापौर दालनात दुपारी साडेतीनच्या सुमारास महापालिका प्रशासनासह महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन, उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते श्री.सुनिल महाजन व महापालिका सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त श्री.श्याम गोसावी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, रोपट्यासह कुंडी व रुमाल देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील आयुष्यासाठी निरामय आरोग्याच्या शुभेच्छाही दिल्या.
सेवानिवृत्त सत्कारार्थी कर्मचार्यांमध्ये श्री.हिरालाल आनंदा सोनवणे (लिपिक), श्री.अशोक कडू चौधरी (मुकादम), श्री.दिनेश तुकाराम नन्नवरे (वाहनचालक), श्री.गजानन मोतीराम चौधरी (नाकेदार), सौ.कलाबाई प्रकाश सोनवणे (आया), श्री.प्रकाश रंगराव पवार (वाहनचालक) यांचा समावेश आहे. या छोटेखानी कार्यक्रमावेळी सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.







