जळगाव : पिंप्राळा हुड़को येथील जुगार अडड्वर पोलिसांचा छापा; चार जणांवर गुन्हा दाखल

जळगाव (क्राइम रिपोर्ट असलम खान) : शहरातील पिंप्राळा हुड़को भागात पठान पैहलवान यांच्या पोल्ट्री फार्म हाउसजवळ जुगार अडड्यावर रात्री रामानंद पोलिस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी छापा टाकून ४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रामानंद पोलिस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या महितीनुसार पिंप्राळा शिवारात असलेल्या पठान पैहलवान पोल्ट्री फार्म हाउसच्या मागील बाजूस एका पत्र्याच्या शेडमध्ये काही जण जुगार खेळ खेळत असल्याची माहिती रामानंद पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक अनिल बडगूजर यांना मिळाली त्यानुसार त्यांनी रविवार १ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पथकाला रवाना करून कारवाई करण्याचे आदेश दिले.

या आदेशानुसार पथकाने कारवाई करत संशियत आरोपी शेख रशीद शेख शब्बीर ( वय ३८, राहणार खाजा नगर पिंप्राळा हुडको), सुफियान खान फईम खान (वय २२ राहणार सालार नगर जळगाव), फिरोज शेख शमशेर पिंजारी (वय ३१, राहणार आजाद नगर पिंप्राळा) अणि गौतम श्यामराव साबळे (वय ४५, राहणार पिंप्राळा हुडको) या चौघांना जुगार खेळताना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातील ४ मोबाइल आणि जूगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी रामानंद पोलिस ठाण्यात पोलिस नाइक शिवाजी धुमाळ यांच्या फिर्यादीवरून रविवार रात्री १० वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here