टोकियो : भारतीय महिला बॉक्सर लव्हलिनला इतिहास घडवण्याची संधी आहे. लव्हलिनने किमान कांस्य पदक निश्चित केले आहे. याआधी भारताला बॉक्सिंगमध्ये विजेंदर सिंग २००८ ऑलिम्पिक आणि मेरी कोम २०१२च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक जिंकले होते. लव्हलिनचे पदक गेल्या ९ वर्षातील हे पहिले पदक आहे. पण आता तिचे लक्ष्य अंतिम फेरीत पोहोचण्याचे असेल. जिथे अद्याप कोणीही भारतीय पोहोचले नाही.
लव्हलिनने उपांत्य फेरीत प्रवेश केला असून आता तिची लढत वर्ल्ड चॅम्पियनशिप बुसेनाज सुरमेनेली हिच्या विरुद्ध होणार आहे. या लढतीत विजय मिळून अंतिम फेरीत पोहोचणारी भारतीय बॉक्सर होण्याची तिला संधी आहे.
उपांत्यपूर्व फेरीतील लढतीनंतर लव्हलिनने म्हटले होते की, पदक तर फक्त गोल्डच असते. मला पहिला ते मिळवू द्या. लव्हलिनची ही पहिली ऑलिम्पिक स्पर्धा आहे. लव्हलिनची लढत तुर्कीच्या सुरमेनेलीविरुद्ध होणार आहेत. सुरमेनेली देखील २३ वर्षाची आहेत. या वर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने दोन सुवर्णपदक जिंकले आहेत.
लव्हलिनने २०१८ आणि २०१९ साली वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कास्य पदक जिंकले होते तर पहिल्या इंडियन ओपन इंटरनॅशनल बॉक्सिंग स्पर्धेत रौप्य आणि दुसऱ्या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. २०१७ साली तिने आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कास्य पदक मिळवले होते.






