लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : आगामी निवडणुकांमध्ये राज्यातील राजकीय वातावरण आता पेटताना दिसत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांच्या राजकीय नेत्यांचे इन्कमिंग सुरू झाले आहे. मंगलाताई बनसोडे आणि रघुवीर खेडकर यांनी आज पुण्यात राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभाग प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांची भेट घेतली. तर लवकरच हे दोघेही कलावंत राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाची धुरा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

तमाशा कलावंत यांच्यासाठी वेळोवेळी हे दोन्ही कलावंत धावून जातात. राष्ट्रवादी सांस्कृतिकच्या माध्यमातून तमाशा कलावंतांसाठी यापेक्षा ही मोठे काम ते दोघेही इथून पुढे करणार आहेत. लवकरच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे ,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये जाहीररीत्या प्रवेश होईल अशी माहिती यावेळी बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे.

यावेळी राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, पुणे जिल्हा अध्यक्ष अभिनेत्री प्रिया बेर्डे, वृद्ध कलावंत मानधन कमिटीचे अध्यक्ष शशिकांत कोठावळे, राज्य समन्वयक संतोष साखरे, प्रदेश सरचिटणीस मंगेश मोरे हे यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here