कांस्य पदकासाठी देणार ग्रेट ब्रिटनशी लढत
टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठत भारतीय महिला हॉकी संघाने इतिहास रचला. आजच्या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. भारतीय रणरागिणी आजची लढत जिंकून अंतिम फेरी गाठतील हा देशवासियांना विश्वास होता.
It's time to script yet another chapter in the saga. 😍
Let's go, India! 💙
🇦🇷 0:0 🇮🇳https://t.co/gJN4bq6gja#ARGvIND #HaiTayyar #IndiaKaGame #Tokyo2020 #TeamIndia #TokyoTogether #Cheer4India #StrongerTogether #HockeyInvites #WeAreTeamIndia #Hockey pic.twitter.com/zyepBCJCc4
— Hockey India (@TheHockeyIndia) August 4, 2021
भारतीय महिलांची सुवर्णपदाची वाटचाल अर्जेंटिनाने उपांन्तफेरीतच रोखली. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात अर्जेंटिनाने भारताला २-१ असे पराभूत करत फायनलमध्ये धडक दिली. अर्जेंटिनाची कर्णधार मारिओ नोएल बारिनोवोने दोन गोल करत संघाच्या विजयाचा पाया रचला. तर भारताकडून ड्रॅग-फ्लिकर गुरजीत कौरने गोल केला. भारताच्या १८ सदस्यीय महिला संघाने सोमवारी तीन वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा १-० असा पराभव करत प्रथमच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.
The Indian Women's Hockey Team fought till the very last second. 👏
We are all proud of you. 🇮🇳#HaiTayyar #IndiaKaGame #Tokyo2020 #TeamIndia #TokyoTogether #StrongerTogether #HockeyInvites #WeAreTeamIndia #Hockey pic.twitter.com/qxeuowff0M
— Hockey India (@TheHockeyIndia) August 4, 2021






