बुमराहचा धडाका : इंग्लंडचा सलामीवीर शून्यावर बाद

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताची जबरदस्त सुरुवात झाली आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर नॉटिंगहम कसोटीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला भारताच्या जसप्रीत बुमराहने पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला. सलामीवीर रॉरी बर्न्सला एलबीडब्ल्यू बाद करुन, भारताला पहिलं यश मिळवून दिलं. पहिल्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर बुमराहने विकेट घेतली.

भारतीय कर्णधार विराट कोहलीने संघात काही बदल करत के एल राहुल आणि शार्दुल ठाकूरला संघात स्थान दिले आहे. सोबतच रवींद्र जाडेजा एकमेव स्पिनर असून आश्विन ऐवजी मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here