कार्यालयात बैठक सुरु असताना आला झटका
नाशिक (प्रतिनिधी) : येथील दैनिक पुढारीचे वितरण व्यवस्थापक दिलीप पाटील यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज निधन झाले. पुढारी कार्यालयात सकाळी बैठक सुरू असतानाच त्यांना त्यांच्या आसनावर झटका आला.
त्यानंतर त्यांना नाशिक सिव्हील रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व इतर कुटुंबीय आहेत. ते जळगाव जिल्ह्यातील मोरगाव तालुका रावेर येथील मूळ रहिवासी आहेत.
त्यांनी लोकमतमधून कारकिर्दीची सुरुवात केली. अनेक वर्षे ते गांवकरीत होते. देशदूतमध्येही त्यांनी काम केले होते. रावेरचे भाजपा तालुका सरचिटणीस सी एस पाटील यांचे ते बंधू होत.






