भारती विद्यापीठ ‘आयएमईडी’च्या २६० विद्यार्थ्यांना प्लेसमेंट

प्लेसमेंटचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण

पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : भारती अभिमत विदयापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेट'(आयएमईडी) च्या एमबीए,बीबीए ,एमसीए अभ्यासक्रमाच्या एकूण २६० विद्यार्थ्यांना भारतातील नावाजलेल्या कंपन्यांमध्ये विविध पदांवर प्लेसमेंटस मिळाल्या आहेत.प्लेसमेंटचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. भारती अभिमत विद्यापीठाचे व्यवस्थापनशास्त्र विभागाचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक डॉ.सचिन वेर्णेकर यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.या विद्यार्थ्यांना देशातील कंपन्यांनी वार्षिक १८ लाखापर्यांत,आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी वार्षिक ५४ लाखापर्यंत पॅकेजेस दिली आहेत.

कार्पोरेट रिसोर्स सेल या स्वतंत्र विभागामार्फत प्लेसमेंटससाठी आयोजित प्लेसमेंट ड्राइव्ह सारख्या उपक्रमाला १५० हुन अधिक कंपन्यांनी प्रतिसाद दिला. टेक महिंद्रा,विप्रो,अमेझॉन,रिलायंस इंडस्ट्रीज,बायजू,टाटा,टीसीएस,आयसीआयसीआय अशा नामवंत कंपन्यांचा त्यात समावेश आहे. आयएमईडी मध्ये उदयोगक्षेत्राकडून विद्यार्थ्यांबद्दल असणाऱ्या अपेक्षा,कुशल मनुष्यबळाची उपलब्धता याबाबत वेगवेगळे मार्गदर्शन घेतले जाते.विशेष प्रशिक्षण,व्यवसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण,समुपदेशन असे उपक्रम आयोजित करण्यात आले.

कुलपती डॉ.शिवाजीराव कदम,कुलगुरु डॉ.माणिकराव साळुंखे ,कार्यवाह डॉ.विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनामुळे ही मजल मारणे शक्य झाले,असे डॉ.सचिन वेर्णेकर यांनी सांगितले.प्राध्यापक वर्ग,स्टाफ,विद्यार्थ्यांनी घेतलेले कष्ट यामुळे हे यश मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here