जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर शाहिद खान / असलम खान) : शहरातील मेहरुण गणेशपुरी भागात सेवानिवृत्त शिक्षकाच्या घरात झालेल्या घरफोडी प्रकरणी दोघा चोरट्यांना जळगाव पोलिसांनी अटक केली आहे. मोहनसिंह जगदीशसिंह, बावरी (वय २०) रा. शिरसोली नाका शिकलकर वाडा तांबापूरा जळगाव अणि फरीद उर्फ गुल्ली मोहम्मद मुल्तानी (वय १९) रा. अजमेरी गल्ली तांबापूरा जळगाव अशी अटकेतील दोघा चोरटयांची नावे आहे.
मंगळवारी रात्री ११.४५ च्या सुमारास या दोघा चोरट्यांना अटक करण्यात आली असून, अजून एका अल्पवयीन मुलाचा या चोरीच्या घटनेत समावेश आढळून आला आहे. त्याला त्याच्या आईच्या ताब्यात देण्यात आले आहे. मोहम्मद युनुस कालू खान या सेवानिवृत्त शिक्षकाच्या अक्सा नगर भागातील घरात १२ जुलै ते २९ जुलैच्या कालावधीत ही चोरी झाली होती. या चोरीत रोख रकमेसह दागिने असा एकुण ६४ हज़ार रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला होता.
या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशनला गु.र.न. ५१९/२१ भा.द.वि.३८०, ४५४, ४५७, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान घटनास्थळनजीक असलेल्या होटल रेडचिल्लीचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात २७ जुलैच्या मध्यरात्री एक मोटरसायकलस्वार संशयास्पदरित्या वावरतांना दिसून आला होता. यावरून मोहनसिंह व फरीद या दोघांना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. आरोपींनी गुन्हात वापरलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.
आरोपी मोहनसिंह जगदीशसिंह बावरी याच्यावर एमआयडीसी, रामानंद पोलिस स्टेशन व जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला विविध गुन्हे दाखल आहेत त्यापैकी एमआयडीसी पोलिस स्टेशनला खुनाचा प्रयत्नाचा गंभीर स्वरूपाचा गुन्हे मोहनसिंह याच्यावर दाखल आहेत साथीदाराच्या मदतीने बलात्कार केल्याच्या गुन्हातून मोहनसिंह हा नुकताचा जामीनवर सुटुन बाहेर आला होता. त्यानंतर लगेचच त्याने हा घरफोडीचा गुन्हा केला.
पोलिस निरीक्षक शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इमरान सैयद, मुदस्सर काझी, गोविंदा पाटिल, सुधीर साळवे, साईनाथ मुंडे, आदिंच्या पथकाने दोघांना अटक केली आहे. मोहनसिंह याच्यासह त्याच्या भावावर देखिल घरफोड़ीचे बरेच गुन्हे दाखल आहेत. न्या. ए.एस.शेख यांच्या समक्ष दोघांना हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोघांना ६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सरकारतर्फे ॲड प्रिया मेढे यांनी न्यालययीन कामकाज पाहिले.






