व्हिडीओ झाला व्हायरल : हॉकी टीमच्या अभिनंदनासाठी पंतप्रधान मोदींनी लावला थेट टोकियोला फोन

टोकियो : ४१ वर्षानंतर देशाला ऑलिम्पिक पदक मिळाले. भारताच्या या विजायनंतर देशात सोशल मीडियापासून ते रस्त्यावर लोकांनी जल्लोष सुरू केला. अशात टोकियोत विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या भारतीय संघाला एक सरप्राइझ कॉल आला.

भारताचा कर्णधार मनप्रीत सिंग आणि मुख्य प्रशिक्षक ग्राहम रीड यांना थेट दिल्लीतून फोन आला. हा फोन अन्य कोणाचा नाही तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा होता. मनप्रीतने PM मोदींचा फोन स्पिकरवर ठेवला होता. भारतीय संघातील अन्य एका खेळाडूने याचा व्हिडिओ शुट केला.

मोदींनी फोनवरून मनप्रीत सिंग, कोच ग्राहम रीड यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, भारतीय संघाचे खुप खुप अभिनंदन, तुम्ही आणि संपूर्ण संघाने फार शानदार काम केले. संपूर्ण देश आनंदाने नाचत आहे. तुम्ही खुप मेहनत घेतली. त्यामुळे हे शक्य झाले. माझ्यावतीने सर्व खेळाडूंना शुभेच्छा द्या. १५ ऑगस्ट रोजी सर्वजण भेटणार आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here