पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला हॉकी संघाला धीर देत त्यांच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप

टोकियो : ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाचं कांस्य पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. पुरुषांप्रमाणेच ऐतिहासिक कामगिरी करण्यात महिला हॉकी संघाला अपयश आलं. रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ब्रिटनच्या संघाने भारतीय महिला संघाला ४-३ ने पराभूत करत कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला हॉकी संघाला धीर देत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. रडणं थांबवा असा वडिलकीचा सल्लाही त्यांनी दिला. तुम्ही खूप छान खेळलात आणि आम्हाला तुमच्यावर गर्व आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. त्यांनी महिला हॉकी संघाशी फोनवरून संवाद साधला.

यावेळी खेळाडूंशी बोलतांना ते म्हणाले की, तुम्ही सर्व खूप छान खेळलात. तुम्ही इतका घाम गाळलात. गेल्या पाच वर्षापासून सर्व सोडून तुम्ही हीच साधना करत होतात. तुमची मेहनत पदक आणू शकलं नाही. मात्र तुमच्या घामाचा प्रत्येक थेंब कोट्यवधी भारतीय महिलांसाठी प्रेरणा आहे. मी संघाच्या सर्व सहकार्यांना आणि प्रशिक्षकांना शुभेच्छा देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here