पी.आर.हायस्कूलच्या शिक्षिका डॉ. वैशाली गालापुरे देत आहेत गुगल क्लासरुमच्या माध्यमातून संस्कृतचे ऑनलाईन शिक्षण

धरणगाव (योगेश पी पाटील) – ज्ञानवंतांची आणि यशवंतांची परंपरा कायम ठेवणाऱ्या शतकमहोत्सवी पी. आर. हायस्कूलचे विद्यार्थी कोरोना संसर्ग काळात घरी बसून ऑनलाईन शिक्षण घेत असून शिक्षकही वर्क फ्रॉम होम आॅनलाईन शिक्षण देत आहेत.
शाळेतील संस्कृतच्या शिक्षिका डॉ.सौ.वैशाली गालापुरे ह्या जून महिन्यापासूनच दहावीच्या विद्यार्थ्याना गुगल क्लासरुमद्वारे शिक्षण देत आहेत. मुलंही मोठ्या उत्साहाने या नावीन्यपूर्ण उपक्रमात सहभागी होत आहेत.
कोरोनाने जगाच्या शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल घडवला आहे. अध्यापनाचीही पद्धत बदलून आॅनलाईन शिक्षण पद्धती अंगिकारली आहे.महाराष्ट्र शासनाच्या शिक्षणविभागाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आपले विद्यार्थी अभ्यासात मागे राहू नये म्हणून पी. आर. हायस्कूलने एप्रिल महिन्यापासूनच दहावीच्या आणि इतर वर्गांतील विद्यार्थ्यांना आॅनलाईन शिक्षण सुरु केले आहे. पी. आर. हायस्कूल मधील उच्चविद्याविभूषित आणि तज्ज्ञ शिक्षक जबाबदारीने शिक्षण देत आहेत.
डॉ. वैशाली गालापुरे ह्या एम. ए. (संस्कृत), एम.ए.(मराठी), पीएच.डी. आणि विद्यापीठ स्तरावर प्राध्यापकपदासाठी लागणारी नेट सेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत. पी.आर.मध्ये अशा उच्चविद्याविभूषित आणि उपक्रमशील तज्ज्ञ शिक्षकांमुळेच यशाची पताका कायमच फडकत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here