जळगाव (क्राइम रिपोर्टर भावेश ठाकूर) : विश्ववेध राज्य पत्रकार संघटनेचे राज्य अध्यक्ष शैलेश पाटील यांच्या हस्ते अहमद नगर जिल्हाध्यक्ष पदी सोहेल मनियार यांची विश्ववेध राज्य पत्रकार संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
याप्रसंगी संघटनेचे राज्याध्यक्ष शैलेश पाटील यांनी म्हटले की, आपण पुढील काळात संघटना मजबूत करण्यासाठी व पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी संघटनेसोबत संघटनेच्या ध्येय धोरणनुसार पुढील वाटचाल कराल हीच अपेक्षा करतो. तसेच त्यांनी ह्या सोबत हे देखील म्हटले की आपण पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दाखल घेत संघटनेने आपल्यावर विश्वास दाखवत अहमद नगर जिल्हा अध्यक्ष या पदावर आपली नियुक्ती केली आहे.
त्यांच्या पुढील वाटचालीस राज्य कार्याध्यश अशोराज तायडे, राज्य सचिव राजेंद्र शर्मा, राज्य उपाध्यक्ष जगदिश गाढे, राज्य सल्लागार युवराज वाघ, जळगाव जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.






