हातकलंगणे रा.काँ.चे माजी आमदार राजीव आवळे यांचे पालकमंत्र्यांना निवेदन
कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : आज जिल्ह्याचे पालकमंत्री ना सतेज पाटील यांना हातकणंगले तालुक्याचे राष्ट्रवादी पार्टीचे नेते माजी आमदार राजीव आवळे यांनी भेटून हातकणंगले मतदारसंघातील पूरग्रस्त गावाचा पंचनामा करताना जाचक अटी रद्द कराव्यात आणि पूरग्रस्त गावातील प्रत्येक स्थलांतरित कुटूंबाना सानुग्रह अनुदान (दहा हजार रु) ची मदत करावी, तसेच हालोंडी संपूर्ण गाव पूरग्रस्त म्हणून घोषित करून सर्वांना नुकसानभरपाई मिळावी या करिता निवेदन दिले.
यावेळी पालकमंत्री ना सतेज पाटील साहेब यांनी हातकणंगले तहसीलदार यांना फोन करून माजी आमदार राजीव आवळे यांच्या निवेदनातील मागणी त्यांना सांगून त्या पद्धतीने पंचनामे करण्यास सांगितले. त्यांच्यासोबत शिष्टमंडळात हालोंडी गावचे सुदर्शन पाटील,अरुण पाटील,जेबी पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते






