प्रहार रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष प्रतापभाऊ तायडे यांचा मदतीला हात

मुंबई (जिल्हा प्रतिनिधीसंतोष कृष्णा जाधव) : रायगड जिल्ह्यातील अस्मानी संकटामुळे आणि अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटना झालेल्या पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी आणि केनवडे ह्या गावाला प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक राज्यमंत्री बच्चु भाऊ कडू यांच्या आदेशानुसार पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भेट देऊन मौलाचे मदत कार्य केले.

प्रहार रुग्णकल्याण समिती अध्यक्ष प्रताप भाऊ तायडे,प्रहार रुग्ण सेवक गोपाळ सुळे, शिवडी विधानसभा अध्यक्ष प्रविण राणे तसेच नवी मुंबईतील प्रहार पक्षाचे समर्थक देवनाथ म्हात्रे आणि सतीश शिंदे ह्यांनी उपस्थित राहून परीस्थितीचे गांभीर्य ओळखून सुतारवाडी आणि केनवडे गावातील ग्रामस्थांना प्रहार जनशक्ती पक्षा तर्फे तातडीची मदत केली.तसेच गावातील सर्व कुटुंबांना अन्नधान्य,पिण्याचे पाणि,कपडे,औषधं व चादर वाटप करून येथील जनतेस मानसिक आधार हि देण्यात आला.

prahaar

साखर सुतारवाडी गावातील दरड कोसळून गंभीर जखमी झालेल्या किमान वीस ग्रामस्थांना प्रहार रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष प्रताप भाऊ तायडे ह्यानी मुंबईतील जे.जे.रूग्णालयात जाऊन त्यांची भेट घेवून त्यांच्या उपचाराची सर्व जबाबदारी पक्षातर्फे करण्याचे आश्वासन देण्यात आले आणि उपचारानंतर सर्व ग्रामस्थांना सुखरूप त्यांच्या घरी पाठवणीची जबाबदारी देखील घेण्यात आली.प्रहार रुग्ण कल्याण समिति चे अध्यक्ष प्रताप भाऊ तायडे हे या ग्रामस्थानसाठि देवमाणूस म्हणून उभेच आहेत.प्रहार जनशक्ती पक्षाची रुग्ण सेवा समिती ही या गावकऱ्यांसाठी देव माणूस म्हणून या गावात ओळखले जाऊ लागले आहे.तसेच समितीचे अध्यक्ष प्रताप भाऊ तायडे आणि सर्व सहकारी यांनाचे आज ग्रामस्थांनी त्यांचे खूप आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here