‘ऑनलाईन आय टी ऑलिम्पियाड ‘चे मंगळवारी पारितोषिक वितरण
पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पै कॉलेज ऑफ व्हिजुअल ग्राफिक्स ,डिझाईन अँड आर्टस् (वेदा )च्या वतीने आयोजित ऑनलाईन आय टी ऑलिम्पियाड चे मंगळवारी पारितोषिक वितरण होणार आहे .
या कार्यक्रमात आयसीटी विषयाच्या ६ शिक्षकांना ‘डॉ इनामदार आय टी एज्युकेटर अवॉर्ड ‘ देऊन गौरविण्यात येणार आहे . ऑनलाईन आय टी ऑलिम्पियाड च्या विजेत्यांनाही या समारंभात पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम १० ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता होणार आहे .
या ऑलिम्पियाडचे यंदाचे दहावे वर्ष होते ,यावर्षी ५ राज्यातील ३ हजार हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला . उमेश खोसे ,मृणाल गंजाले,नागनाथ विभुते ,प्रकाश चव्हाण ,शफी शेख ,आनंद अनेमवाड या शिक्षकांना ‘डॉ इनामदार आय टी एज्युकेटर अवॉर्ड ‘ देण्यात येणार आहे . डॉ पी ए इनामदार ,इरफान शेख ,डॉ ऋषी आचार्य ,अंजुम काजळेकर हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.






