जळगावातील बिल्डींग पेंटर असोसिएशनचे निलिमा गोऱ्हे यांना निवेदन
जळगाव (क्राइम रिपोर्टर शाहिद खान) : शहरातील बिल्डींग पेंटर असोसिएशन संचलित हिंदू मुस्लिम एकता बिल्डींग पेंटर वेल्फेअर असोसिएशनतर्फे विधान परिषदेच्या उपाध्यक्ष निलिमा गोऱ्हे यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील बांधकामावर काम करणाऱ्या कामगारांना कामगार कल्याण मंडळाच्या शासकीय योजनांचा फायदा मिळत नाही. त्यामध्ये ऑनलाइन व इतर समस्यांच्या अडचणी येत आहेत. मागील १६-२० महिन्यांपासुन कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे रोजगार कमी झाल्यामुळे पेंटर बांधवांना आर्थिक उत्पन्न होत नसल्याने, त्याचे परिवारावर उपासमार होण्याची वेळ आलेली आहे.
तरी अमळनेर, पारोळा, एरंडोल, चोपड़ा, म्हसावद, येथील सर्व बिल्डींग पेंटर बांधवांना शिष्यवृत्तीसह इतर शासकीय योजनांचा लाभ मिळावा तसेच ज्या त्रूटीमुळे त्यांना या शासकीय योजनांपासून दूर ठेवले जात आहे. त्यांचे तात्काळ निराकरण करण्याचे आदेश कामगार आयुक्त जळगाव यांना द्यावेत, अशी विनंती करण्यात येत आहे.






