पाकिस्तानात हिंदू मंदिराची तोडफोड; भारताने नोंदवला निषेध

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये हिंदूंच्या मंदिराना लक्ष्य करण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रातांतील हिंदू मंदिरावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. जमावाने मंदिरातील मुर्तीची तोडफोड केली आणि मंदिराचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. काही दिवसांपूर्वी एका लहान हिंदू मुलाने मुस्लिम मदरशामधील वाचनालयात लघुशंका केली होती. त्या घटनेची प्रतिक्रिया म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

रहीम यार खान जिल्ह्यातील भोंग शहरातील गणेश मंदिरावर जमावाने बुधवारी हल्ला केला. हल्लेखोरांजवळ काठ्या, दगड आणि विटा होत्या. त्यांनी धार्मिक घोषणा देत मूर्तींची मोडतोड केली, तसेच मंदिराचा काही भाग जाळला. याप्रकरणी मुख्य न्यायाधीश अहमद आज सुनावणी करणार आहेत. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. सत्ताधारी पाकिस्तान तेहरीक-ई-इन्साफ पक्षाचे खासदार डॉ. रमेशकुमार वांकवानी यांनी मंदिरावरील हल्ल्याचे व्हिडीओ आपल्या टि्वटरवर शेअर केले आहेत.

परिसरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पाकिस्तान सरकारने अर्धसैनिक दल तैनात केले आहे. मंदिराची तोडफोड झाल्यानंतर भारताने गुरुवारी घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. तसेच मुख्यत्वे मुस्लिम पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदूंना संरक्षण देण्याची मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here