प्रवासी वर्ग व वाहन चालकांची बनली डोकेदुखी यावर वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का?
कारंजा (तालुका प्रतिनिधी हफीज खान) : कारंजा शहरातील बायपास रोडवर असणारा झाशी राणी चौकातील रस्ता संपूर्ण खड्डेमय झाला असून हा रस्ता प्रचंड वर्दळीचा आहे. वाशिम यवतमाळ या मार्गात जोडणारा हा मुख्यमार्ग असल्यामुळे येथे मोठ्या वाहनांची सुध्दा -ये -जा सुरू असते. या शिवाय बायपास परिसरात सर्व कॉलोनी नागरिकांना ये-जा करण्यासाठी हा मुख्यरस्ता आहे. यामुळे या रस्त्यात कायम वर्दळ असते. परंतु रस्त्याची अवस्था पूर्णपणे अशी झाली वाहनचालकांना आपल्या वाहनांना काढतांना तारेवरची कसरत करावी लागते.
हा रस्ता नागरिकांकरिता डोकेदुखी बनला असून, पावसाच्या पाण्याने आपली वाहने खड्डयाच्या पाण्याचे डबके भरले असून यामध्ये आपली वाहने कशी काढायची असा प्रश्न पढला असून यावर वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का कारण झाशी राणी चौक ते औरंगाबाद महामार्ग जोडणारा मंगरूळपीर रस्त्यावर सुद्धा मोठमोठे खड्डे बगायला मिळत असून खड्डयांमुळे अपघात होऊन कोणी किरकोळ जखमी झाले. जीव गमवावा लागला. याकडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देवून संबंधित अधिकाऱ्यांनी खड्डे बुजवा अशी मागणी जनसामान्य लोकांकडून होत आहे.
https://business.facebook.com/BulandPoliceTimes/videos/361339262035593/






