सातारा शहरात मंगल कार्यालयात चोरी करणारा सराईत चोरटा जेरबंद; सातारा शहर डी.बी. पथकाची ४८ तासांत धडक कारवाई

सातारा

सातारा (उपसंपादक अरुण मोरे) | सातारा शहरातील कोरेगाव रोडवरील एका मंगल कार्यालयातून ३ तोळे सोने आणि ३६ हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना समोर आली होती. सातारा शहर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांच्या आत हा गंभीर गुन्हा उघडकीस आणून सराईत चोरट्यास ताब्यात घेतले असून, ११०% मुद्देमाल हस्तगत केला आहे.

 

दिनांक ९ जुलै २०२६ रोजी दुपारी १२:१० ते १२:५० वाजेच्या सुमारास सातारा शहरातील कोरेगाव रोडवरील एका मंगल कार्यालयात विवाह सोहळा व हळदी समारंभ सुरू होता. यादरम्यान, वधू पक्षाच्या उघड्या दरवाज्यातून रूममधील पर्समध्ये ठेवलेले ३ तोळे सोने आणि ३६,000 रुपये रोख रक्कम अज्ञात चोरट्याने लांबवली होती. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडूकर आणि सातारा विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री. विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे यांनी सातारा शहर डी.बी. पथकाला तपासाच्या सक्त सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार, डी.बी. पथकातील कर्मचाऱ्यांनी गोपनीय बातमीदाराच्या व तांत्रिक विश्लेषğाच्या मदतीने कोल्हापूर जिल्ह्यातून एका संशयितास ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरी गेलेला संपूर्ण सोन्याचा ऐवज व रोख रक्कम असा एकूण ४,५०,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, जप्त करण्यात आलेला १०० टक्के मुद्देमाल मूळ फिर्यादीस परत करण्यात आला आहे.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय अधिकारी श्री. विपुल पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो.हवा. निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव, पो.ना. पंकज मोहिते, पो.कॉ. तुषार भोसले, सागर गायकवाड, सुशांत कदम, सुहास कदम, सचिन रिटे, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, आशिकेष डोळस, वैभव माने, सचिन आदमाने तसेच सायबर पोलीस ठाण्याकडील स्टाफने पार पाडली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here